Thursday, December 26, 2013

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास - Yearly horoscope 2014 - Taurus

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास 
नूतनवर्षाभिनंदन ...
शनीचे षष्ठस्थानातील वास्तव्य आणि पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण यामुळे नवीन वर्षात तुम्ही सतत एका दबावाकाली राहाल, परंतु धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरू तुम्हाला वेळोवेळी साथ देत राहील. विचारपूर्वक आणि संथपणाने पाऊल टाकण्याची तुमची पद्धतच यंदाही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शनी, हर्षल, नेपच्यून असे पूर्ण तीन ग्रह फारसे सात देणार नाहीत, तेव्हा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची त्याप्रमाणे धोरण ठरविण्याची खास कामगिरी करवी लागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत लांबचा प्रवास किंवा परदेशगमनाची शक्यता आहे.
धंदा, व्यवसाय व नोकरी

नोकरीमद्ये संस्थेकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच प्रोत्साहन मिळेल. पगारवाढ किंवा नवीन भत्ते मिळतील. चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल, परंतु त्यानंतर मात्र कामाचा तणाव खूपच वाढेल. जून, जुलै तसेच ऑक्टोबरला आपल्या धंदा, व्यसायात, प्राप्तीच भर पडली आहे, असे आढळून येईल. कलावंत कलाकार क्षेत्रातील व्यक्तींना जून-जुलैत चांगली संधी मिळेल. नोकरी किंवा उच्च शिक्षणाकरिता परदेशात जायचे आहे, त्यांना बरेच कष्ट पडतील. प्रॉपर्टी किंवा घरामधले बराच काळ रेंगाळत पडलेले प्रश्न असतील तर तडजोडीतून सुवर्णमध्य काढा. 

गृहसौख्य व आरोग्यमा

विवाहोत्सुकांना कौटुंबिक जीवनात पदार्पण करता येईल. गुरूचे पाठबळ चांगले लाभत असल्यामुळे यंदा तुमच्या हातून कही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील. वृद्धांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. तरुण-तरुणींनी आपला जोडीदार चिकित्सक पद्धतीने निवडून विवाह ठरावावेत. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. वृषभ रास ही स्थिर गुणधर्म असलेली पृथ्वीतत्त्वाची जिचा अधिपी शुक्र आहे व चिन्ह बैल आहे. शुभरंग निळा, गुलाबी, शुभरत्न ‍‍हिरा 
व आराध्य दैवत विष्णू-देवी आहे. वृषभेत चंद्र म्हणजे ग्रहांच्या उच्च राशीत समजला जातो.


इतर राशी : मेष  वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन   

No comments:

Post a Comment