वार्षिक राशिभविष्य २०१४ - कर्क रास
नूतनवर्षाभिनंदन… गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी
जानेवारी, फेब्रुवारीत बदली आणि बढतीचे योग येतील. व्यापार उद्योगात एका हाताने द्यायचे आणि दुसर्या हाताने कमवायचे असा अनुभव येईल. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जूनपर्यंत कामामध्ये विस्तार आणि गुंतवणूक करावी लागेल. त्याला फायदा जुलैनंतर मिळेल. नोकरदार व्यक्ततींना ज्यांना पदोन्नती किंवा जादा पगारवाढ पाहिजे असेल, त्यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मार्चपर्यंत चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. महिला शिक्षण व कला क्षेत्रात आघाडीवर राहतील.
गृहसौख्य व आरोग्यमान
नवीन वर्षे कौटुंबिक दृष्टीने साधारण आहे. शुक्राचे भ्रमण राशीच्या सप्तमस्थानात असल्यामुळे आला दिवस हसून साजरा कराल. याच दरम्यान घरातील सदस्य आणि त्यांच्या जीवनातील काही चंगले क्षण बघायला मिळतील. या वर्षी आरोग्याची थोडी कुरबूरही राहील. जून-जुलैमध्ये एखादी चांगली घटना घडल्याने घरात वातावरण प्रसन्न राहील. घरात नव्या पाहुण्याची भर पडेल. प्रवास व तीर्थयात्रा अचानक घडून येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल. कर्क रास ही चर गुणधर्माची, जल तत्वाची आहे. तिचा अधिपती चंद्र व चिन्ह खेकडा आहे. शुभरंभ पांढरा, शुभरत्न मोती व आराध्य दैवत शकंर-गणपती आहे.
इतर राशी : मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन
No comments:
Post a Comment