खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Saturday, March 24, 2012

Kultejas...!!! ह्या ब्लॉगचा एक वर्षातील आढावा .

                                              येत्या २७ मार्च २०१२ला Kultejas...!!! ह्या आपल्या मराठी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने २०११-१२ ह्या  वर्षभरातील आढावा संक्षिप्त स्वरुपात आपण घेऊ.
                                             ब्लॉग " BLOG " हा शब्द मला कळला,तो देखील एक वर्षापूर्वीच. मला ब्लॉग आणि ब्लॉगिंग ह्याबद्दल आधी काहीच माहिती नव्हते. मला सर्वप्रथम ह्याबद्दल माहिती मिळाली ती STAR माझा ह्या news channel च्या " ब्लॉग माझा " ह्या स्पर्धेच्या निकालांवरून.... मी ह्या स्पर्धेचे निकाल पाहत असताना 2know.in  ह्या ब्लॉग बद्दल कळले. आणि त्यानंतर जास्तीत जास्त मदत मला  2know.in ह्या ब्लॉग मधूनच झाली त्याबद्दल  2know.in चे आभार. त्यानंतर हळूहळू ब्लॉगबद्दल शिकत गेलो. 




kultejas...!!! चा पहिला वाढदिवस, १ वर्ष पूर्ण .


                                             जपर्यंत Kultejas...!!! ह्या ब्लॉगवर मी केवळ ३० post केले आहेत, खरं
सांगायचं झालं तर हा ब्लॉग सुरु करताना कोणताच महत्वाचा असा उद्देश मनात नव्हता, म्हणूनच " जसं मनात येईल तसं..." ह्या एका उक्ती खाली हा ब्लॉग चालू आहे. सुरवातीला जे आवडेल ते आणि जसे असेल तसे मी post करत होतो. पण आता हळूहळू कळू लागले आहे, जे आपले स्वतःचे असेल तेवढेच आणि त्यालाच शेवटी किंमत असते. म्हणून नंतर काही दिवासांनी मला असे सुचले, सध्या संगणकाचे युग आहे आणि संगणकाबद्दल अजूनही बऱ्याच लहानलहान गोष्टींबद्दल देखील आपल्याला काहीवेळा ज्ञान नसते. म्हणून अशी माहिती देणारे " संगणकाशी दोस्ती.(Friendship with Computer) " ह्या सदरामधून मी काही लेख लिहिले त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आणि इथे एक महत्वाचे सांगावेसे वाटते ते म्हणजे मराठीमधून इंटरनेटवर बरीच कमी माहिती उपलब्ध आहे किंवा आपण कोणताही शब्द Search करताना मराठीचा वापर करत नाही. त्यासाठी " इंटरनेटवर देवनागरी (मराठी) भाषेतुन कसे लिहाल? " हा लेख देखील kultejas...!!! वर प्रसिद्ध केलेला.असेच काही महत्वपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन करणारे लेख यापुढेही सातत्याने लिहिण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्याला ह्या ब्लॉगबद्दल काय वाटतं किंवा काही नवीन सुचवायचं असेल तर त्यासाठी संपर्क हे नवीन पान चालू केले आहे तिथे जाऊन आपल्या सूचना पाठवू शकता, आपल्या सूचनांचे नेहमी स्वागत आहे. 
                                          या एक वर्षामध्ये मिळालेल्या आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक  आभार...!





2 टिप्पणी पोस्ट करा:

  1. नमस्कार,

    आपल्या ब्लॉगच्या प्रथम वर्षपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!

    -विवेक वाटवे
    vrvatve@rediffmail.com
    sankalpsuchi.blogspot.in

    ReplyDelete