खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, May 03, 2011

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही




जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू,
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या,
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे,
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही !
उद्याउद्याची किती काळजी बघ रांगेतुन;
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही !
शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणुनी;
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही !
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

संगीत ; गायक : सलिल कुलकर्णी

गीत: संदीप खरे



हे भलते अवघड असते 



गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले

गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला ...
हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...
तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...
तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...

इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?

ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...
कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...
हे भलते अवघड असते…
गीत - संदीप खरे

संगीत - सलील कुलकर्णी
गायक - सलील कुलकर्णी 

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment