
ते पण एक वय असतं...
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं...
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं...
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं.....