खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Thursday, December 26, 2013

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कन्या रास - Yearly horoscope 2014 - Virgo

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कन्या रास  
नूतनवर्षाभिनंदन… 
संपूर्ण वर्षभर गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. तुमच्या हिशेबी, चिकित्सक व व्यवहारी स्वभावाला साथ देणारे ग्रहमान आहे. मात्र विचारांच्या जंजाळातच गुंतून न पडता प्रत्यक्षात कृती करण्याचे धोरण ठेवा. गुरूचे दशम व लाभ स्थानातील भ्रमण तुम्हाला यशप्राप्ती करून देणारे आहे.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास - Yearly horoscope 2014 - Leo

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास
नूतनवर्षाभिनंदन… 
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना ‍आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कर्क रास - Yearly horoscope 2014 - Cancer

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कर्क रास 
नूतनवर्षाभिनंदन… 
गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मिथुन रास - Yearly horoscope 2014 - Gemini

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मिथुन रास
नूतनवर्षाभिनंदन… 
राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील. 
धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास - Yearly horoscope 2014 - Taurus

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास 
नूतनवर्षाभिनंदन ...
शनीचे षष्ठस्थानातील वास्तव्य आणि पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण यामुळे नवीन वर्षात तुम्ही सतत एका दबावाकाली राहाल, परंतु धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरू तुम्हाला वेळोवेळी साथ देत राहील. विचारपूर्वक आणि संथपणाने पाऊल टाकण्याची तुमची पद्धतच यंदाही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शनी, हर्षल, नेपच्यून असे पूर्ण तीन ग्रह फारसे सात देणार नाहीत, तेव्हा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची त्याप्रमाणे धोरण ठरविण्याची खास कामगिरी करवी लागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत लांबचा प्रवास किंवा परदेशगमनाची शक्यता आहे.
धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मेष रास - Yearly horoscope 2014 - Aries



वार्षिक राशिभविष्य २०१४ - मेष रास

नूतनवर्षाभिनंदन ...
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-‍ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी

Friday, December 13, 2013

मराठी कॅलेंडर २०१४ - Marathi Calendar 2014 - Marathi Calendar 2014 PDF Free Download


मराठी कॅलेंडर २०१४ - Marathi Calendar 2014 - 2014 Marathi Calendar PDF Free Download :

Saturday, November 02, 2013

मासिक राशिभविष्य नोव्हेंबर २०१३



मासिक राशिभविष्य नोव्हेंबर २०१३

मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Monday, July 01, 2013

मासिक राशिभविष्य जुलै २०१३



मासिक राशिभविष्य जुलै २०१३ 

मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-