नमस्कार मित्रांनो, आज आपणा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की, kultejas ह्या ब्लॉग ला सुरुवात करून २७ मार्च २०१३ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण ह्या ब्लॉगच्या दोन वर्षामधील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
ह्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये kultejas ह्या ब्लॉगला मिळालेला तुमचा मोठा प्रतिसाद आणि असंख्य असा वाचक वर्ग ह्यासर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मला आठवतयं २७ मार्च २०११ पूर्वी इंटरनेटवर असंख्य software शोधण्याचे वेड मला होते. जवळजवळ १ वर्ष; जून २०१० मध्ये आमच्याकडे इंटरनेट आले तेंव्हा पासून मला तो एक छंदच जडला होता. त्यानंतर एकदा स्टार माझा ह्या news channel वर मला ब्लॉग माझा ह्या स्पर्धेविषयी कळाले. त्याच वेळेपासून मी हा एक नवीन उपक्रम करायचा म्हणून हा ब्लॉग सुरु केला. ह्या माध्यमातून हळूहळू नवीन नवीन विषयांवर लेख लिहिण्याचे ठरवले परंतु नंतर असे वाटू लागले कि आपण जे लिहित आहोत त्याचे वर्गीकरण कोणत्या विषयामध्ये होऊ शकेल ? हा प्रश्न पडताच मी लिहिलेले लेख तपासून पाहिले तर प्रत्येक लेखाचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व होते. ह्याच अशा वेगवेगळ्या लेखांमुळे मला ह्या ब्लॉगची tag line मिळाली " जसं मनात येईल तसं…" त्यामुळे इथे मला
अनेक विषयांवर माझे मत मांडता येते.
kultejas...!!! चा दुसरा वाढदिवस, २ वर्ष पूर्ण. |
आता आपण पाहू आत्तापर्यंत आणि आजही मिळत असलेला आपण मायबाप वाचकांचा प्रतिसाद, आत्तापर्यंत सुमारे ३६ वाचकांनी संपर्क इथे आपले मत मांडून तसेच काही मदत हवी असेल तर ती मदत मागण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे. ह्या ब्लॉगला आजपर्यंत ४२५ Subscribers लाभले आहेत जे ह्या ब्लॉगचे नियमित वाचक आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत राहील ह्यात शंका नाही. तसेच आजपर्यंत वाचकांनी वाचलेल्या पानांची संख्या जवळ जवळ १००००० (१ लाख) झाली आहे. ही वाचलेल्या पानांची संख्या kultejas...!!! चा पहिला वाढदिवस, १ वर्ष पूर्ण झाले तेंव्हा वाचकांनी वाचलेली पाने केवळ १२५०० होती. परंतु पोस्टची संख्या जसजशी वाढत गेली तसे वाचकही उत्तरोत्तर वाढत आहेत. त्यासाठी मी वाचकांचा मनःपूर्वक आभारी आहे, असेच प्रेम ह्या ब्लॉगवर करत राहा. ह्यापुढे मी देखील अनेक नवीन नवीन विषयांवर लेख लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि आपल्याला किमान आठवड्यातून एक नवीन लेख वाचता येईल असे मी आश्वासन देतो. आपण आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहोत.
No comments:
Post a Comment