वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृषभ रास - Yearly horoscope 2015 - Taurus
नववर्षाभिनंदन, २०१५ सालातील गुरु तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थीतपणे पार पडालचं, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. असे असले तरी वृषभ राशिभविष्य २०१५ सालच्या कुंडलीनुसार शनि
आठव्या स्थानात असल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळण्यात थोडे अडथळे निर्माण होतील. पण काळजी करू नका, सुखाचे मुल्य जाणवावे यासाठी आनंदाच्या क्षणांआधी तुम्हाला थोडे कष्ट सोसावे लागतील. त्याचबरोबर तुमच्या खासगी आयुष्यात अनुरुपातेचा अभाव निर्माण होईल. पण थोडेसे प्रयत्न करून तुम्ही सगळे अडथळे पार करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर पाचव्या स्थानात असलेला राहू हेच दर्शवतो की प्रेमात सत्यता आणि प्रामाणिकपणा हे घटक अत्यंत महत्वाचे असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहाल, याची काळजी घ्या. संपत्ती विषयी सांगायचे झाल्यास, हे वर्ष उत्तम असणार आहे. घरातील वस्तू खरेदीसाठी बराचसा खर्च होईल. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना २०१५ सालात काही अनपेक्षित निकाल पहावयास मिळतील.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी २०१५ सालामध्ये करण्याचे उपाय : काळ्या रंगाच्या गाईची सेवा करा.
No comments:
Post a Comment