वार्षिक राशिभविष्य २०१५ - सिंह रास - Yearly horoscope 2015 - Leo
नववर्षाभिनंदन, सिंह राशीच्या व्यक्तींना २०१५ सालामधील कुंडलीनुसार हे वर्ष संमिश्र असेल. गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ उतार चढावाचा असेल. २०१५ सालातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुरु तुमच्या १२ व्या स्थानात आहे आणि शनि ४थ्या
स्थानात आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण वैतागून जाऊ नका, हा तुमच्यामधील क्षमता पडताळून पाहण्याचा काळ आहे. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तुलनेने वर्षाचा उत्तरार्ध अधिक चांगला दिसून येत आहे. तुमचे त्रास ह्या कालावधीत हळूहळू कमी होतील. असे असले तरी या काळात तुम्हाला कोणी काही बोलले तरी फार मनावर घेऊ नका. २०१५ सालामधील सिंह राशीच्या कुंडलीनुसार या काळात स्थिर आणि शांत राहिलेले योग्य राहील. तुमच्या अचूक नियोजनामुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल. तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. एकूणच या वर्षी अनेक औत्सुक्यपूर्ण घटना घडतील. २०१५ या वर्षाचा पुरेपूर वापर करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध लागेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित एक असामान्य व्यक्ती होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष लाभदायक ठरणार आहे मनाची एकाग्रता वाढेल.
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: गायीला दुधभात खाऊ घाला.
No comments:
Post a Comment