Monday, December 29, 2014

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
                  "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" ह्या विशेष सदरामधील हा दुसरा लेख ज्यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, फायदे व तोटे आणि उपयोग, चला तर मग सुरुवात करू संगणकाच्या इतिहासापासून आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत "अबँकस" (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते.
              जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे. तेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किंवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाने संगणकाचा डाटा मोजला जातो.

      १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या
अमेरिकन शास्त्रज्ञाने पंचकार्ड प्रणालीचा शोध लावला. या प्रणालित कोणते ही काम वेगात पार पाड़ता येवू लागले. त्यानीच पुढे आयबीएम कंपनी (इंटरनेशनल बिज़नेस मशीन) सुरु केली. १९४७ साली अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठ व आयबीएम या कंपनीने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक तयार केला. त्याचे नाव  इलेक्ट्रॉनिक्स न्युम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅल्क्यूलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रज्ञात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला. हेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाणे  कॉम्प्युटर डाटा मोजला जातो.

Bit - Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits

Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits
Megabyte (MB) 1,024 Kilobytes
Gigabyte (GB) 1,024 Megabytes
Terabyte (TB) 1,024 Gigabytes
Petabyte (PB) 1,024 Terabytes
Exabyte (EB) 1,024 Petabytes or » 1048576 TB 1073741824 GB

संगणकाचे प्रकार :-
                        संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले. पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा. डेस्कटॉप, लॅपटॉप


संगणकाचे तीन प्रकार आहेत. 
१) अनालॉग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हायब्रीड कॉम्प्युटर


               डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरला जातो. डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता. आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे. सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत. हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते. इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटिअम (Pentium) या नावाचा संगणक बाजारात आणला. नंतर त्यात बदल होत गेले. पेंटिअम - १ , पेंटिअम - २, पेंटिअम - ३, पेंटिअम - ४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यांनी निर्मिती केली. सध्या आय - ३, आय - ५, आणि सगळ्यात लेटेस्ट क्वाड कॉर प्रोसेसर असे अनेक संगणक वापरात आहेत. सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ आणि त्यानंतरच्या प्रोसेसरमुळे  कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला. घडी करुण ठेवण्या सारखे, आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक, निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इनबिल्ट असतात.  या सिस्टिम च्या बाहेर बिजागरिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लॅपटॉप असे म्हणतात. संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लॅपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले. लॅपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरणे सर्वाना सुलभ ठरले. ज्या प्रमाणे  मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लॅपटॉप ही चार्ज करावा लागतो अर्थात आता लॅपटॉपची जागा tablet pc आणि स्मार्ट फोन घेऊ लागले आहेत.  

सुपर कॉम्प्युटर :-
                   हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे. हा संगणक विशिष्ठ मोठ्या संस्थेमध्ये वापरला जातो. उदा. अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही संस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते.

मेनफ्रेम कॉम्प्युटर :-
                       हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा संग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो. उदा. विमा कंपनी

काम करण्याची पद्धत :-
                                 संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Device)
2) सी. पी. यु. सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Device)

इनपुट डिवाइस (Input Device) :- 
                        संगणकाला माहिती आज्ञा देणाऱ्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात. संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मिळविण्यासाठी त्याला योग्य माहिती देणे जरुरी असते. ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड, माउस, स्कॅनर, वेब कॅमेरा, या भागांचा समावेश असतो.

सी. पी. यु. सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-
                         हा संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग, याच विभागाला संगणकाचा मेंदू ही म्हणतात. सी. पी. यु. संपूर्ण लहान इलेक्ट्रॉनिक भागानी बनलेला आहे. संगणकातील वापरामध्ये येणाऱ्या पी -४ मध्ये जवळ जवळ ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले असतात. सी. पी. यु. ला ही दोन भाग असतात.

अ) अरिथ्मेटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल युनिट 

अ) अरिथ्मेटिक लॉजिक यूनिट :-
                                  हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे. याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते, त्यावर प्रक्रिया होते. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात. तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील करण्याचे काम ह्याच विभागात केले जाते.

ब) कंट्रोल यूनिट :-
                     संगणकामध्ये होणाऱ्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवतो त्याच प्रमाणे कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवते.

इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .

आउट पुट विभाग :-
                 इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते. म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात. उदा :- मॉनिटर, प्रिंटर

संगणकाचे फायदे आणि उपयोग
         संगणक हे आज विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणाऱ्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे. आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टीक्षेप टाकुया.
१) वेग:- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यंत वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.
२) सातत्य:- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो. संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही. 
३) स्वयंचलित:- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुन दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किंवा देख्ररेखी शिवाय पार पाडतो.
४) तार्किक व अमृत प्रक्रिया:- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो. कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो.

                                        थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याची तसेच संग्रहाची, विस्तारण्याची क्षमता अफाट आहे. म्हणुन आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो.
१) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणना करण्यात संगणक तरबेज आहे.
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुन ठेवता येते, या संग्रहित करुन ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो.
३) संगणकाचा उपयोग करुन आलेख, आकृत्या,  तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात. २D, ३D अश्या प्रकारच्या वेग वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून कोणतेही काम सहज सोप्पे झाले आहे.  
४) कोणत्या ही चित्र, व्हिडीओ संगणकाच्या सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो.
5) उद्योग धंदे, व्यापार, बँक, कॉल सेंटर, शेअर मार्केट, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय, तिकीट  रिसर्वेशन, अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो.
६) भौतिक, गुंतागुंतीच्या शास्त्रात, सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे.
७) रोगाचे निदान करण्यासाठी प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते.
८) इंजिनियरला घराचे, इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो संपूर्ण नकाशा बनवु शकतो.
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी देखील संगणकाचा उपयोग केला जातो.

अर्थात आता ह्याच संगणकाची जागा सध्याचे स्मार्टफोन्स, Tablet pc घेत असल्याचे दिसून येते.  

1 comment: