मित्रांनो WhatsApp बद्दल मी वेगळे काय सांगू, आपण सर्वजण WhatsApp बद्दल जाणून असलाच अर्थात हल्ली प्रत्येकाकडे WhatsApp हे application हमखास पाहायला मिळते. जो व्यक्ती Android फोन वापरतो त्याच्याकडे हे अगदी १००% असतेच; किंबहुना WhatsApp साठी Android फोन विकत घेणारे अनेक लोक असतील. WhatsApp हे जगातील सर्वात जास्ती वापरले जाणारे आणि जास्ती वेळा डाऊनलोड केले गेलेले Application आहे. तुमच्याकडे जर कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
WhatsApp for PC |
आपल्याला माहितीच असेल की, WhatsApp वरून अपण टेक्स्ट मेसेज, फोटो, विडीओ तसेच गाणी share करू शकतो. आणि ते देखील जगामध्ये आपल्याला कोणालाही ह्या फाइल्स इंटरनेट च्या माध्यमातून काही क्षणामध्ये पाठविता येतात. WhatsApp हे Application जवळ जवळ सगळ्याच मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम साठी उपलब्ध आहे जसे की; IOS, Android, Blackberry, Symbian, Java आणि अजून अनेक स्मार्टफोनवर हे application चालते. परंतु असे देखील अनेक लोक आहेत कि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये. आणि त्यांना WhatsApp वापरायचे आहे अशा लोकांसाठी WhatsApp for pc हा एक उत्तम पर्याय आहे.
आता आपण पाहू WhatsApp आपल्या संगणकावरून कसे वापरता येईल. आपण एक लक्षात घेतले पाहिजे WhatsApp हे application खास करून मोबाईल वापरणाऱ्यांसाठी तयार केले गेलेले आहे. म्हणजेच थोडक्यात काय संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी अजूनतरी हे उपलब्ध नाहीये त्यासाठी आपल्याला काही उपाय योजना म्हणजेच आपल्या संगणकामध्ये काही सॉफ्टवेअर Install करावी लागतील. अधिक माहिती आपण टप्याटप्याने पाहू :-
How To Download WhatsApp For Pc - संगणकासाठी WhatsApp कसे डाऊनलोड करता येईल ?
१. पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल कि आपल्या संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे जर ती windows xp / vista/7/8/8.1 असेल तर हे शक्य आहे. तसेच इतर ऑपरेटिंग सिस्टीम साठी देखील तिथे पर्याय उपलब्ध आहेत.
२. सर्वप्रथम आपल्याला Bluestacks हे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर install करावे लागेल त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
३. हे Bluestacks App Player Install करून जीमेल आयडी वरून लॉग इन करा.
४. आता search icon वर क्लिक करा अथवा My apps आणि search app वर क्लिक करा.
५. त्यानंतर WhatsApp असे search करा, त्यामध्ये whatsapp हा शब्द असणारे अनेक apps तुम्हाला तिथे दिसतील
६. आता त्यामधील Official Whatsapp निवडा आणि त्यावर क्लिक करा तिथून direct लिंक App store वर जाईल म्हणजेच तुमच्या browser मध्ये ती लिंक ओपन होईल तेथुन योग्य ते WhatsApp डाऊनलोड करून Install करा.
७. Installation पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊन लॉग इन करा व आता मेसेजेस आणि chatting करण्यासाठी तुम्ही तयार आहात.
ह्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर कोणतीही पर्वा न बाळगता आपले प्रश्न खालील टिप्पणी मध्ये लिहून विचारा. तसेच ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी खालील उपलब्ध पर्यायांद्वारे जास्तीत जास्त share करा.
No comments:
Post a Comment