prey overview |
ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम आणि जियोलोकेशनच्या आजच्या काळात कोणत्याही लॅपटॉप, मोबाईल अथवा टॅबलेट कॉम्प्युटरचे लोकेशन किंवा ठावठिकाणा शोधून काढणे तितकेसे अवघड राहिलेले नाही. अशा गॅजेट्समध्ये जीपीएस सुविधा मात्र असायला हवी. काही फ्री सॉफ्टवेअर आणि काही ऑनलाईन सेवांनी हरवलेल्या लॅपटॉपपर्यंत पोहोचणे शक्य केले आहे. मात्र, अद्याप तरी याची माहिती केवळ तंत्रज्ञानविषयी सजग असलेल्या लोकांपुरतीच मर्यादित आहे. असो मी पुढे एक सॉफ्टवेअर विषयी माहिती देत आहे.
प्रे (prey) नावाचे एक सॉफ्टवेअर आहे. ते प्रेप्रोजेक्ट.कॉम ह्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल, हे पूर्णपणे मोफत आणि सुरक्षित आहे. हे सॉफ्टवेअर लॅपटॉपची भौगोलिक स्थिती म्हणजे तो कुठे आहे यावर आणि युजरच्या ऑनलाईन वापरावर नजर ठेवून असते. स्निको नावाचे आणखी एक सॉफ्टवेअर आहे. तेदेखील प्रेप्रमाणेच विंडोजसहित मॅकिन्टोश आणि लिनक्स, ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करते. अर्थात लॅपटॉप सुरक्षेसाठी तुम्ही पैसे खर्च करायला तयार असाल तर तुमचे पर्यायही वाढतात हेही तितकेच खरे आहे. भारतातही अनेक कंपन्यांनी अशा प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
क्विकहिल या antivirus कंपनीने ट्रॅकमायलॅपटॉप.नेट लॅपटॉप शोधण्याची ऑनलाईन सुविधा प्राप्त करून दिली आहे. क्विकहिलचा antivirus तुम्ही खरेदी केला असेल तर या वेबसाईटवर तुमचा लॅपटॉप आवश्यक त्या माहितीसह रजिस्टर्ड करा आणि निश्चिंत राहा. इथे लॅपटॉपच्या मेक Address चे रेकॉर्ड ठेवले जाते. लॅपटॉप हरवल्यावर जेंव्हा केव्हा युजर इंटरनेटशी कनेक्ट होतो तेंव्हा लॅपटॉप कुठे आहे याची माहिती रजिस्टर्ड युजरला पाठविली जाते. लॅपटॉप कॉप नावाचे आणखी एक सॉफ्टवेअर लॅपटॉपच्या सुरक्षेसाठी डाऊनलोड करून घेत येते. पण हे मोफत नाही.
No comments:
Post a Comment