Wednesday, April 24, 2013

Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे.

                                      मित्रांनो, आज पर्यंत बऱ्याच लोकांना असा प्रश्न सतत जाणवत होता किंवा अनेक दिवस बरेच लोक एका गोष्टीच्या शोधत होते ते म्हणजे इंटरनेटवरून घरबसल्या पैसे कसे कमवित येतील. आणि हे खरच शक्य आहे का ? तर ते आपण Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा ! ह्या लेखाद्वारे पहिले आहे, जर अजूनही कोणाच्या मनात शंका असतील आणि कोणी registration केले नसेल तर त्यांनी Neobux इथे जाऊन आत्ताच registration करा. आणि ज्यांनी registration केले आहे त्यांचे अभिनंदन. 
payza 
                                 
paypal 









                                      आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाची अशी माहिती. जी माहिती इंटरनेट वरून पैसे कमाविणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे. इंटरनेटवरून पैसे मिळवीत असताना प्रत्येकाच्या मनात आलेला हा प्रश्न असेल कि आपण मिळविलेले पैसे आपल्यापर्यंत पोहोचणार कसे ? आणि कोणत्या अकौंट मध्ये हे जमा केले जातील ? पुन्हा हे पैसे डॉलर मध्ये असतील तर त्याचे आपल्या चलनामध्ये रुपांतर कसे होणार ? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडले असतील. त्याचे निरसन ह्या लेखामधून होइल ह्यात शंका नाही. तर आता मी जास्ती वेळ न घालविता विषयाकडे वळतो.


Paypal आणि Payza  म्हणजे काय ? :-
                                     Paypal आणि साधारण त्यासारखेच असणारे Payza. इथे अकौंट असणे म्हणजे इंटरनेटवरून आपण कोणत्याही कामाचे मिळविलेले पैसे सुरक्षितरीत्या आपल्या बँक अकौंट मध्ये पोहोचविणे.

Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे ? :-
                                    हे अकौंट काढण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स बारकाईने वाचा.
१. प्रथम Paypal किंवा Payza ह्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर जा.
२. तेथील Sign up हा पर्याय निवडा. त्यानंतर individual/personal ह्या पर्यायावर क्लिक करा.
३. आता तिथे एक फॉर्म दिसेल तो अचूकपणे आणि काळजीपूर्वक भरा.
४. इथे देत असलेला इमेल पत्ता हा आपला अकौंट नंबर प्रमाणे वापरत येईल त्यामुळे तो अचूक आणि वापरत असलेलाच द्या.
५. आपली संपूर्ण माहिती आपले नाव, वडिलांचे नाव , जन्म तारीख, PAN card नंबर अगदी अचूक भरा.
त्यानंतर आपल्याकडे क्रेडीट/ डेबिट कार्ड असेल तर त्याची माहिती लिहा नसेल तर नाही भरले तरी चालेल.
६. हे सगळे पूर्ण भरून झाल्यावर आपला password लक्षात ठेवा.

Paypal चे अकौंट व्हेरीफाय कसे करायचे ? :- 
                                    आपण आता अकौंट तर काढले आहे. ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण जो इमेल ह्या अकौंट साठी दिला आहे त्यामध्ये लॉगइन करा तिथे आपल्याला एक Paypal कडून इमेल आला असेल तो ओपन करून त्यामध्ये दिलेली लिंक क्लिक करा. आपले अकौंट verify होईल. आता महत्वाचे म्हणजे आपले बँक अकौंट Paypal ला कसे जोडायचे. त्यासाठी Paypal ला लॉग इन केल्यानंतर आपल्याला आतमध्ये profile मध्ये Link/Edit bank हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा. आणि add ह्या पर्यायावर जाऊन आपल्या चालू आणि राष्ट्रीयकृत बँकेचा अकौंट नंबर, त्या खात्याचे नाव, branch  तिथे काळजीपूर्वक भरा. आपण हे नाव लिहित असताना ते बँक खात्याशी जुळणे महत्वाचे आहे त्यासाठी पासबुक बघा आणि त्याप्रमाणे इथे नाव लिहा. आणि continue करून verification साठी हे अकौंट add  करा.

Paypal व्हेरिफिकेशन प्रोसेस :-
                                   आपण एकदा बँक अकौंट add केल्यानंतर ४ ते ५ दिवसांच्या अवधीमध्ये त्या बँक अकौंटवर Paypal १.५० ते २ रुपये अशा अगदी छोट्या रकमा पाठवेल. त्या आपल्याला बँकेत जाऊन पासबुकवर मांडून आणाव्या लागतील आणि त्या रकमा आपल्याला Paypal वर अकौंट व्हेरिफिकेशनमध्ये अचूक भरायच्या आहेत. आता आपले अकौंट व्हेरिफाय झाले असेल.

Paypal चे दर :-
                                   खाली दिलेल्या चित्रावरून आपण  Paypal आकारत असलेल्या दरासंबंधी फलक पाहू शकाल. त्यासाठी transaction fee इथे देखील आपण हा फलक पाहू शकाल.

Paypal चे दर
तर इंटरनेटवरून मिळालेले पैसे आपण बँकेमध्ये कसे कॅश स्वरुपात आपण मिळवू शकतो हे आपल्या लक्षात आले असेल. जसे Paypal चे अकौंट आपण पहिले तसेच Payza चे पण अकौंट काढता येते. आपल्याला काही शंका असतील तर त्या खाली दिलेल्या Comment बॉक्स मध्ये विचाराव्यात.


7 comments:

  1. account should be savings a/c or current a/c ? I have a savings a/c.

    Regards,

    Girish R Kulkarni

    ReplyDelete
    Replies
    1. saving & current a/c both should be valid for paypal & payza.

      Delete
  2. http://make-it-simply-easy-life.com/

    ReplyDelete
  3. donhi account kadhne jaruri ahe ka?

    ReplyDelete
  4. Nahi, donhi accounts kadhnyachi avashyakta nahi.... keval payza / paypal ek account kadhun dekhil apan transactions karu shakta.

    ReplyDelete
  5. Mala kahi kalat nahi ahe me tumhal tumchya personal id var mail pthavla ahe plz mala reply dya. me probux var account open kele ahe.

    ReplyDelete
  6. CAN THIS ALL PROCESS IS SAFE ? BECZ BANK ACC. NUMB & PAN CARD NO. ARE MENTION IN PAYPAL ACC.

    ReplyDelete