Thursday, July 07, 2011

संगणकाचे स्पीड वाढवा.

संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                  आजपासुन आपण काही संगणकाविषयी महत्वपुर्ण माहिती घेणार आहोत,तर सुरवातीला पाहुयात संगणकाचे स्पीड कसे वाढवता येईल? आपण बरेचदा संगणकावर काम करताना काही 'एरर' येतात.याकरिता संगणकामधिल "temp" फाईल्स डीलीट करणं आवश्यक असतं.त्यासाठी एक सोपा पर्याय म्हणजे 'स्टार्ट'वर क्लिक करुन 'रन'ऑप्शन सिलेक्ट करा.एक छोटी विंडो ओपन होईल.

Saturday, July 02, 2011

जीवन म्हणजे...





जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष.


* जीवन म्हणजे म्रुत्युशी चाललेला लपंडाव

* जीवन म्हणजे बऱ्या- वाईट स्म्रुतीचे गाठोडे

* जीवन म्हणजे सुख दुखाच्या मिश्रणाचे नाटक

* जीवन म्हणजे बुध्दी, शील, चारित्र्य यांचे संवर्धन

* जीवन म्हणजे बुध्दी, भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम

* जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवाह

* जीवन म्हणजे सुख-दुखाच्या चौकड्या आणि जन्म म्रुत्युच्या सीमा असणारा सारीपाट

* जीवन म्हणजे एक शाळा आहे. ज्यात आपण काहीतरी नवीन शिकत असतो.

* जीवन हे क्षणाक्षणाने बनते. क्षण जाता जीवन जाते





प्रेम




प्रेम - 


दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

                                                - kultejas