खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, January 06, 2015

इंटरनेट - Internet - संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे

इंटरनेट - Internet - संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे


१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इन्टर्नैशनल संगणक नेटवर्क विकसित केले. जगातील छोट्यानेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. १९९२ मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर युरोपिअन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले. ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स, एनीमेशन, ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेले माध्यम होते. वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले. आणि
इंटरनेट २१ व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटेलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. तर हे इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटासही जोडून देतो त्याला वेब म्हणतात.  इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

संपर्क :- इंटरनेट द्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही जगातील कुठल्याही व्यक्तिशी संपर्क साधू शकता. आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतःच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता.

शॉपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा एखादी वस्तु विकू ही शकता. बाजारात आलेल्या नवीन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मिळते. इलेक्ट्रोनिस्क कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता.


सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे. जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेटवरून मिळू शकते. शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालयाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर मोफत वाचत येतात. शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघात येतात.

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमीच आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजिना आहे. संगीत, चित्रपट, मासिक तसेच ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो. ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत.

इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणकाशी जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणक विश्वाचा एक भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून पोहचू शकतो. गूगलअर्थ ही अशी एक इंटरनेट वरील साईट आहे की जगातील कोणत्याही देशामधून आपण पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व माहिती फोटोसहीत नेटच्या माध्यमातून पाहू शकतो.  इंटरनेट बरोबर जोड़णी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़णी साठी एक्सेस देते. हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो. बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन हे इंटरनेटचे मोडेम मुळे मिळते.


इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेचे असते. यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला, गुगल क्रोम हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत. संगणकाच्या डेस्कटॉप आणि इंटरनेट ह्यामधील ब्राउजर्स हे एक दुवा आहेत. वेबसाइट चे नाव किंवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेचे आहे. संगणकामधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरात येणाऱ्या नियमांना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. तर .com (.कॉम) म्हणजे कम्युनिकेशन होय.

सध्या इंटरनेट चा वापर खूप प्रमाणामध्ये वाढला आहे. पूर्वी प्रमाणे आता संगणकावरूनच नाही तर त्याहीपेक्षा सर्वाधिक वापर हा स्मार्टफोन्स वरून होताना दिसतो. इंटरनेट हे एक असे मध्यम आहे जे माणसाला दिवसभर खेळवून ठेवते कारण संपूर्ण जगच आपल्या समोर अवतरते त्यामुळे त्यामधील काय चांगले काय वाईट ह्याची पारख आपल्या मध्ये असणे अगदी जरुरीचे आहे. आणि आपण ह्यासाठी किती वेळ द्यावा हे देखील विचार करण्यासारखे आहे. असो इंटरनेटबद्दल माहिती कशी वाटली आणि अजून आपल्याला काय वाटते हे नक्की comments मध्ये लिहा आणि share करा. 

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment