खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Friday, March 09, 2012

घरातील सर्व बिलं भरा ऑनलाइन ...!

                                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                 आजपर्यंत आपल्याला घरातील प्रत्येक गोष्टीचे बिल भरण्यासाठी बराचवेळ रांगेत उभे राहावे लागत असे, परंतु आता अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत ज्या वापरून आपण आपला वेळ तसेच इंधनाची बचत करू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत घरातील विविध गोष्टींचे बिल उदा. वीज बिल ,फोन बिल , मोबाईल बिल इत्यादी इंटरनेटवरून ऑनलाइन कसे भरता येईल.

इलेक्ट्रिसिटी (लाईट ) बिल :-



१. इलेक्ट्रिसिटी (लाईट ) बिल ऑनलाइन भरण्यासाठी ह्या लिंकवर  क्लिक करा .
MAHAVITARAN

२. वीज बिल भरण्यासाठी ही महावितरणची अधिकृत वेबसाईट आहे , ह्या लिंकवर प्रथम क्लिक करा , नंतर ह्या        वेबसाईट वर गेल्यावर प्रथम आपले अकौंट ओपन करावे लागेल.
३. त्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या New Users Register Here ह्या लिंकवर क्लिक करा,आणि आपली सर्व माहिती अचूक भरा.

४. त्यानंतर आपले  अकौंट तयार होईल, आपल्याला त्याविषयीचा इमेल देखील मिळेल.
५. आता आपण वीज बिल भरण्यासाठी तयार आहात.आपल्या अकौंटवर असलेल्या विविध पर्यायांद्वारे आपण  आपल्या आधिच्या बिलांविषयी देखील माहिती मिळवू शकतो.बिल भरण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या  View & Pay Current Bill वर क्लिक करून बिल भरता येईल.

फोन (Landline BSNL)  बिल :-

BSNL
            
                                    वीज बिल कसे भरावे ते आपण आत्ता पहिले, त्याचप्रमाणे आपण आता पाहू फोन (landline BSNL) बिल ऑनलाइन कसे भरता येईल. वीज बिलाप्रमाणेच आपल्याला इथेही आपले स्वतःचे खाते काढावे लागेल.

१. प्रथम ह्या लिंकवर क्लिक  करा.
२. नंतर New User? Sign Up  ह्या लिंक वर क्लिक करून आपले नवीन खाते उघडा.
३. त्यानंतर आपल्याला एक इमेल मिळेल,त्यामध्ये आपले user name आणि password असेल.तो वापरून पुन्हा लॉग इन करून आपण आपले फोन बिल भरू शकता.

मोबाईल बिल/रिचार्ज  :- 

                             मोबाईल बिल भरण्यासाठी/ रिचार्जसाठी असलेल्या काही महत्वाच्या वेबसाईट्स पुढीलप्रमाणे :-
१.

     आयडिया मोबाईल बिल / रिचार्ज करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा. My Account वर    Register now  इथे क्लिक करून आपले अकौंट काढून बिल / रिचार्ज करता येईल.  


२.
     एयरटेल मोबाईल बिल postpaid साठी ह्या लिंक वर क्लिक करा,तसेच prepaid recharge साठी ह्या लिंक वर क्लिक करा.


३.
       वोडाफोन मोबाईल बिल postpaid साठी ह्या लिंक वर क्लिक करा,तसेच prepaid recharge साठी ह्या लिंक वर क्लिक करा.

४. तसेच एक महत्वाची वेबसाईट्स ज्यावरून आपण कोणताही मोबाईल online रेचार्ज करू शकतो. त्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.:-

paytm



1 टिप्पणी पोस्ट करा: